उपवासाचा खमंग ढोकळा 

साहित्य :

1] वरईचे पीठ दीड वाटी

2] अर्धा कप पाणी

3] 3 ते 4 हिरव्या मिरच्या

4] बारिक चिरलेली कोथिंबीर

5] मीठ चवीनुसार

6] चिमुटभर खाण्याचा सोडा

7] आल्याचा किस (एक टी स्पून)

8] जिरेपूड (अर्धा टी स्पून)

9]  ताक दोन चमचे

10] पाव चमचा लिंबाचा रस

 कृती :

1]पीठ चाळणीने चाळून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ, आल्याचा किस, जिरेपूड, वाटलेली मिरची, ताक आणि पाणी घाला.

2] मिश्रण एकजीव करून झाकून ठेवा. 

3]अर्धा ते पाऊण तासाने लिंबाच्या रसात सोडा कालवा आणि एकत्र केलेल्या मिश्रणात घालून एकत्र करून घ्या. 

4]प्रेशर कुरच्या भांड्याला आतून तुप लावून घ्या. 

5]त्यामध्ये तयार मिश्रण ओतून कुकरमध्ये ठेवा. 

6]कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून ठेवा. 

7]15 ते 20 मिनिटांत ढोकळा तयार होईल. 

8]थोडा थंड झाल्यावर वड्या पाडून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog