साबुदाण्याची इडली
साहित्य :
1]200 ग्रॅम साबुदाणा
2]200 ग्रॅम दही
3]250 ग्रॅम वरईचे तांदूळ
4]बेकिंग सोडा
5]चवीनुसार मीठ
6]अर्धा चमचा जिरे
कृती :
1]साबुदाणा आणि वरईचे मिक्सरमध्ये वेगवेगळे आणि बारीक वाटून घ्या.
2]हे मिश्रण एकत्र करून त्यात दही, मीठ, जिरे आणि गरजेनुसार पाणी टाकून भिजवावे.
3]हे मिश्रण एक तास झाकून ठेवावे.
4]इडलीपात्राला तूप किंवा तेल लावावे.
5]गरजेनुसार पातेल्यात झाकलेले मिश्रण काढून त्यात पाव टी स्पून चमचा बेकिंग सोडा टाकून एकजीव करा.
6]ते मिश्रण इडली पात्रात घेऊन नेहमीप्रमाणे इडली वाफवून घ्या.
7]हलकी, चवदार इडली तयार.
Awesome.. Recipe..... 😋😋😋😋
ReplyDelete