Posts

  साबुदाण्याची इडली साहित्य :   1]200 ग्रॅम साबुदाणा  2]200 ग्रॅम दही  3]250 ग्रॅम वरईचे तांदूळ  4]बेकिंग सोडा  5]चवीनुसार मीठ  6]अर्धा चमचा जि रे    कृती :  1]साबुदाणा आणि वरईचे मिक्सरमध्ये वेगवेगळे आणि बारीक वाटून घ्या.  2]हे मिश्रण एकत्र करून त्यात दही, मीठ, जिरे आणि गरजेनुसार पाणी टाकून भिजवावे.  3]हे मिश्रण एक तास झाकून ठेवावे.  4]इडलीपात्राला तूप किंवा तेल लावावे.  5]गरजेनुसार पातेल्यात झाकलेले मिश्रण काढून त्यात पाव टी स्पून चमचा बेकिंग सोडा टाकून एकजीव करा.  6]ते मिश्रण इडली पात्रात घेऊन नेहमीप्रमाणे इडली वाफवून घ्या.  7]हलकी, चवदार इडली तयार . 
  उपवासाचा खमंग ढोकळा  साहित्य : 1] वरईचे पीठ दीड वाटी 2] अर्धा कप पाणी 3] 3 ते 4 हिरव्या मिरच्या 4] बारिक चिरलेली कोथिंबीर 5] मीठ चवीनुसार 6] चिमुटभर खाण्याचा सोडा 7] आल्याचा किस (एक टी स्पून) 8] जिरेपूड (अर्धा टी स्पून) 9]  ताक दोन चमचे 10] पाव चमचा लिंबाचा रस   कृती : 1]पीठ चाळणीने चाळून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ, आल्याचा किस, जिरेपूड, वाटलेली मिरची, ताक आणि पाणी घाला. 2] मिश्रण एकजीव करून झाकून ठेवा.  3]अर्धा ते पाऊण तासाने लिंबाच्या रसात सोडा कालवा आणि एकत्र केलेल्या मिश्रणात घालून एकत्र करून घ्या.  4]प्रेशर कुरच्या भांड्याला आतून तुप लावून घ्या.  5]त्यामध्ये तयार मिश्रण ओतून कुकरमध्ये ठेवा.  6]कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून ठेवा.  7]15 ते 20 मिनिटांत ढोकळा तयार होईल.  8]थोडा थंड झाल्यावर वड्या पाडून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. 
Image
 कांदे पोहे   साहित्य - चार मूठ जाड पोहे - एक मध्यम कांदा - मोहरी - जिरे - हिंग - हळद - ५-६ कढीपत्ता पाने - ३-४ हिरव्या मिरच्या - ३-४ चमचे तेल - चवीपुरते मीठ - १ चमचा साखर - लिंबू - चिरलेली कोथिंबीर - खवलेला नारळ कृती १) जाड पोहे चाळणीत घालून भिजवावेत. त्यातील पाणी निथळून जाऊ द्यावे. २) कांदा बारीक चिरून घ्यावा. कढईत तेल गरम करावे. ३) त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालावी. कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घालावेत. ४) फोडणीतच मीठ आणि साखर घालावे म्हणजे पोह्याला व्यवस्थित मीठ, साखर लागते. ५) थोडे परतून कांदा घालावा. कांदा गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यावा. ६) कांदा शिजला कि त्यात भिजवलेले पोहे घालावेत आणि उलथन्याने नीट एकत्र करावे. ७) तेल आणि कांदा सर्व पोह्यांना लागेल याची काळजी घ्यावी. ८) मध्यम आचेवर वाफ द्यावी. गरज वाटल्यास थोड्या पाण्याचा हबका मारावा तसेच आवश्यक वाटल्यास मीठ घालावे. काही मिनीटे वाफ द्यावी. ९) करताना पोह्यांवर लिंबू पिळावे आणि वरून चिरलेली कोथिंबीर व खवलेला नारळ घालावा.
Image
 बटाटा बर्फी   साहित्य •    उकडलेले बटाटे 3 •    तूप 2चमचे •    साखर 1 वाटी •    खवा अर्धी वाटी •    काजू बदामाचे तूकडे 2 चमचे कृती   •  बटाटा उकडून कूस्करले •  तूपात भाजून घेतले ,खवा टाकून मिसळून भाजून घेतले •  साखर टाकून मिसळून, विरघळून घेतलं ,काजू बदामाचे तूकडे घातले •  घट्ट झाल्यावर ताटाला तूप लावून त्यात मिश्रण ओतून एकसारखे थापले ,फि्जमध्ये थंड करून घेतले •  थंड झाल्यावर वड्या कापून घेतल्या व काजू लावले