कांदे पोहे
साहित्य
- चार मूठ जाड पोहे
- एक मध्यम कांदा
- मोहरी
- जिरे
- हिंग
- हळद
- ५-६ कढीपत्ता पाने
- ३-४ हिरव्या मिरच्या
- ३-४ चमचे तेल
- चवीपुरते मीठ
- १ चमचा साखर
- लिंबू
- चिरलेली कोथिंबीर
- खवलेला नारळ
कृती
१) जाड पोहे चाळणीत घालून भिजवावेत. त्यातील पाणी निथळून जाऊ द्यावे.
२) कांदा बारीक चिरून घ्यावा. कढईत तेल गरम करावे.
३) त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालावी. कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घालावेत.
४) फोडणीतच मीठ आणि साखर घालावे म्हणजे पोह्याला व्यवस्थित मीठ, साखर लागते.
५) थोडे परतून कांदा घालावा. कांदा गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यावा.
६) कांदा शिजला कि त्यात भिजवलेले पोहे घालावेत आणि उलथन्याने नीट एकत्र करावे.
७) तेल आणि कांदा सर्व पोह्यांना लागेल याची काळजी घ्यावी.
८) मध्यम आचेवर वाफ द्यावी. गरज वाटल्यास थोड्या पाण्याचा हबका मारावा तसेच आवश्यक वाटल्यास मीठ घालावे. काही मिनीटे वाफ द्यावी.
९) करताना पोह्यांवर लिंबू पिळावे आणि वरून चिरलेली कोथिंबीर व खवलेला नारळ घालावा.

Comments
Post a Comment