बटाटा बर्फी


 साहित्य

•    उकडलेले बटाटे 3
•    तूप 2चमचे
•    साखर 1 वाटी
•    खवा अर्धी वाटी
•    काजू बदामाचे तूकडे 2 चमचे

कृती
 
•  बटाटा उकडून कूस्करले

•  तूपात भाजून घेतले ,खवा टाकून मिसळून भाजून घेतले

•  साखर टाकून मिसळून, विरघळून घेतलं ,काजू बदामाचे तूकडे घातले

•  घट्ट झाल्यावर ताटाला तूप लावून त्यात मिश्रण ओतून एकसारखे थापले ,फि्जमध्ये थंड करून घेतले

•  थंड झाल्यावर वड्या कापून घेतल्या व काजू लावले

Comments

Post a Comment